News34 chandrapur
चंद्रपूर : काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे निर्माण झालेले चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी आता काँग्रेसच्या वतीने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. या अंतर्गत ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्थरावर जनसंपर्क केला जाणार आहे. आज भद्रावती येथे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते यांची सुरवात करण्यात आली.
त्यांनी स्वतः भद्रावती येथील दुकान व्यावसाईक तसेच समाजातील प्रत्येक घटकाला भेटून राहुल गांधी यांचे भारत जोडो बद्दल माहिती व मोदी सरकारच्या जनविरोधी निर्णयाबद्दल जनजागृती करणारे पॉपलेत याप्रसंगी देण्यात आले.
Hath se hath jodo
यावेळी तालुका अध्यक्ष वर्षा ठाकरे, शहर अध्यक्ष सरिता सूर, नगरसेविका जयश्री दातारकर, तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, विनयबोधी डोंगरे, दजामकाऊ गुंडावार, बोढाले गुरुजी, धर्मेंद्र हवेलीकर, प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, तन्वीर शेख, प्रदीप घागी, चंदूभाऊ दानव, निखिल राऊत, अक्षय बोन्डे, महेश मोरे, ईश्वर निखाडे, मंगेश मत्ते, गोकुळ रोडे, गोरू थैम, लीला ढुमणे, प्रतिभा निमकर, खुटेमाटे, प्रतिभा सोनटक्के, लता इंदूरकर, राजूरकर, शीतल गेडाम, ज्योती मोरे, रुकसाना शेख, कविता सुपी, रेखा राजूरकर, शोभाताई पारखी, अनिता मुळे, प्रतिभा निमकर यांची उपस्थिती होती.
आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे जिल्ह्यात झालेली वातावरण निर्मिती टिकवून ठेवणे गरजेचे असून वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवर होणारे अत्याचार त्याच प्रमाणे मोदी सरकारच्या फसव्या घोषणा यामुळे जनता हैराण झाली आहे. जनतेपर्यंत मा. खासदार राहुल गांधी यांच्या संदेश पोहचावा व पुन्हा एकदा काँग्रेसच्या माध्यमातून जनतेचे सरकार यावे याकरिता हाथ से हाथ जोडो अभियानाची सुरवात भद्रावती येथून करण्यात आली आहे.