News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - आद्यशक्ती अष्टभुजा धारिनी माता दुर्गादेवीचा स्थापना (वर्धापन) दिवस मुल येथील माता दुर्गा मंदिर समितीच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने २६ फेब्रुवारी २०२३ रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे.
सकाळी दुर्गा मातेचा अभिषेक सुरु असताना विधान परिषद शिक्षक संघाचे नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांनी सपत्नीक माता दुर्गा देवीचे दर्शन घेतले याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष, व माजी जी.प. अध्यक्ष मान.संतोषसिंह रावत यांनी मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांचे उपस्थितीत आमदार सुधाकर अडबाले यांचा मंदिर समितीच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. आमदार अडबाले यांनी मदिर परिसराची पाहणी करतांना मंदिरासाठी दहा लाख रुपयाचा निधी देणार असे आश्वासन मंदिर विस्वस्थांसमोर दिले.
याप्रसंगी मंदिर समितीचे उपाध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राकेश रत्नावार,सचिव संजय पडोळे,विश्वस्त व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर, विश्वस्त तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील शेरकी, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष संदीप कारमवार,संचालक राजेंद्र कन्नमवार, प्राथामिक सह.सोसायटीचे अध्यक्ष धनंजय चींतावार, सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील मारकवार, हसन वाढई, विश्वस्त रुपल रावत, कैलास चलाख,माजी नगर सेवक विनोद कामडे, सुरेश फुलझेले, चतुर मोहुरले, केदारनाथ कोटगले, आदी सदस्य उपस्थित होते.