News34 chandrapur
छत्तीसगड - ट्रक व पीकअप वाहनांच्या धडकेत तब्बल 11 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाल्याची घटना छत्तीसगड राज्यातील बलोदाबाजार-भाटापारा मार्गावर घडली.
हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे, खिलोरा येथून अर्जुनी कौटुंबिक कामासाठी हे कुटुंब आले होते.
साहू कुटुंब काम झाल्यावर रात्री उशिरा ते परत असताना त्यावेळी खमरिया येथे DPWS शाळेजवळ त्यांच्या पीकअप वाहनाला ट्रक ने जोरदार धडक दिली. Big accident
धडक इतकी जोरदार होती की यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी झाले, मृतांमध्ये 4 बालकांचा समावेश आहे. Fatal accident
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना रायपूरला नेण्यात आले आहे.
या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी दुःख व्यक्त करीत जखमींना चांगला उपचार मिळावा व मृतक यांच्या कुटुंबाला मदत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहे.