News34 chandrapur
बल्लारपूर - चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठली, जिल्ह्यात अनेक नवे दारू परवाने व काही स्थलांतरित दुकाने आली मात्र आता त्याचा त्रास नागरिकांना व्हायला लागला आहे.
एका भागात बार, देशी दारू भट्टी व बिअर शॉपीचे परवाने देण्यात आले ज्यामुळे अनेक नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. Opposition to liquor store
बल्लारपूर शहरातील राणी लक्ष्मी वॉर्ड, किल्ला वॉर्ड गांधी वॉर्ड सहित परिसरात 2 बार, बिअर शॉपी असून आता या भागात देशी दारूचे नवे दुकान सुरू होत असल्याची माहिती आहे.
मागील 50 वर्षांपासून या भागात नागरिकांचे वास्तव्य आहे, या परिसरात कन्या विद्यालय, जनता विद्यालय, कोर्ट, तहसील कार्यालय व शिकवणी वर्ग असूनही त्याठिकाणी दारू दुकानांमध्ये सतत वाढ होत आहे.
ज्यामुळे या भागात दारूमुळे काही अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून परिसरातील महिलांनी या विरोधात एल्गार पुकारत दारू दुकानांना विरोध केला आहे.