News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - माळी महासंघ पूर्व विभागाचे प्रशिक्षण शिबिर दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोज रविवारला सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत स्थळ - उन्मन वंशीय विकास संस्था सावता लान शाहू नगर, मानेवाडा बेसा रोड नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.तरी या शिबिराला पूर्व विदर्भातील माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे यांनी केले आहे.
शिबिराचे उद्घघाटन सकाळी १० वाजता होणार असून उद्घघाटक राष्ट्रीय सचिव रवींद्र अंबाडकर यांचे हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष अरुण तीखे, प्रमुख अतिथी प्रदेश महासचिव नानासाहेब कांडलकर, विभागीय अध्यक्ष चंद्रकांत बोरकर, कार्याध्यक्ष मुकुंदराव पोटदुखे यांचे हस्ते होणार असून. शिबिर पाच सत्रात पार पडणार आहे. दुसऱ्या सत्रात संघटनात्मक विस्तार या सत्राचे अध्यक्ष. महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.एन.एस. कोकोडे यांचे अध्यक्षतेखाली संघटन यावर चंद्रकांत बोरकर, महिला सक्षमीकरण यावर ज्योतीताई देवघरे, समाजातील सांस्कृतिक चळवळ यावर विजयाताई मारोतकर, शेतकरी परिस्थिती सुधारणा यावर नाना इंगळे, विधी व न्याय यावर ऍड.विशाल गणगणे,सहकार विस्तार यावर संदीप भुस्कट, युवकांपुढील आव्हाने हर्षल तिजारे, अभियंता चळवळ यावर चक्रधर टाकरखेडे, प्रा.शिक्षक यापुढील आव्हाने यावर धनंजय देवते, वैद्यकीय संसाधने यावर प्रसिद्ध सर्जन डॉ.संजय घाटे, कर्मचारी समस्या यावर केशवराव दाहिकर यांचे अमूल्य असे मार्गदर्शन लाभणार आहे. तर तिसऱ्या सत्रात महासंघाची वेबसाईट. संगणक हाताळणे प्रशिक्षण यावर तज्ञ अनुराग ठाकरे, चौथ्या सत्रात समाज आणि उद्योजकता यावर सौरभ निमकर, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माळी समाजाची भूमिका यावर माजी जी.प.अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांचे सुयोग्य असे मार्गदर्शन होणार आहे. समारोपीय मार्गदर्शनात स्थान,विस्तार भूमिका यावर माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांचे सविस्तर विस्तृत विचार लाभणार आहे.करीता या शिबिराला पूर्व विभागातील माळी महासंघाच्या सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आव्हान प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे यांनी केले आहे.