News34 chandrapur
चंद्रपूर/घुग्गुस - सध्या देशात क्रमांक 1 वर असलेली भाजप पार्टी आज नागरिकांना प्रामाणिक पणाचे धडे देताना दिसत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच नागरिकांना विविध व जनकल्याणकारी सुविधा देण्यात मागे राहिले नाही, शेतकरी व सरकार यांचा आता थेट संबंध येतो यामुळे सध्यातरी शेतकरी सुखावला आहे.
मात्र चंद्रपूर जिल्ह्यात भाजप पक्षाचे हे चित्र उलट आहे. Fraud teacher
भारतीय जनता युवा मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष व जनता शाळेत कार्यरत शिक्षक विवेक बोढे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जनकल्याणकारी सुविधेच्या उलट काम करीत सध्या प्रकाश झोतात आले आहे. Bjp fake teacher
बोढे हे शिक्षक आहे, मुलांना ज्ञान देण्याचं ते काम करतात, विशेष म्हणजे ते ज्ञान विद्यार्थ्यांना त्यांनी दिलंच नाही, कारण ते शाळेतच गेले नाही.
त्यांनी आपलं मोलाचं ज्ञान हे भाजप कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवले होते तर शाळेत त्यांनी आपल्या जागी एका युवकाला शिकविण्यासाठी ठेवले.
त्यांचा हा प्रताप घुग्गुस कांग्रेसने उघडकीस आणला आहे. Chandrapur bjp
घुग्गुस कांग्रेसचे शहर अध्यक्ष राजू रेड्डी व अनवर यांच्याकडे पालकांच्या तक्रारी आल्या होत्या की शाळेत एक बनावट शिक्षक दुसऱ्याच्या जागी विद्यार्थ्यांना शिकवीत आहे.
तक्रारींवर राजू रेड्डी यांनी कार्यकर्त्यांसह धडक दिली, त्यावेळी त्यांना शुभम अशोक कोयाडवार हे विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविताना आढळले, रेड्डी यांनी मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ते संगणक शिक्षक असल्याचे सांगितले, मात्र शाळेत संगणक नावाची एकही वस्तू आढळली नाही. Congress
प्रकरण अंगावर येणार म्हणून शुभम कोयाडवर ने शाळेतून पळ काढला, मुख्याध्यापक सुद्धा घाबरले, रेड्डी यांनी शाळेत विद्यार्थ्यांशी बोलणी केली असता शुभम हा बोढे यांच्या जागी शिकवितो अशी धक्कादायक माहिती मिळाली.
सदर प्रकार मागील 5 वर्षांपासून सुरु होता, लगेच रेड्डी यांनी मुख्याध्यापकांची कानउघाडणी केली, संस्थाध्यक्ष यांना याबाबत माहिती देण्यात आली.
बोढे यांना शाळेतून 74 हजार पगार मिळतो तो पण शाळेत न येता.
आज बेरोजगारांची संख्या देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे, चंद्रपुरात मात्र प्रामाणिक पक्षाचे प्रदेश पदाधिकारी स्वतःच्या जागी बोगस शिक्षकांची नियुक्ती करीत पुढच्या पिढीचे भविष्य अंधारात टाकण्याचे काम करीत आहे.
हा सर्व प्रकार राजू रेड्डी यांनी उघडकीस आणत, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, संस्थाध्यक्ष, पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत राजू रेड्डी यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष करणारे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे या कटात सामील प्रत्येक व्यक्ती, मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष शिक्षणाधिकारी व बोगस शिक्षक व प्रामाणिक भाजप पक्षाचे शिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
8 दिवसात जर यावर कारवाई करण्यात आली नाही तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी कांग्रेस आंदोलन उभारले असा इशारा रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिला. Political news
रेड्डी यांच्या आरोपावर भाजयुमो चे प्रदेश उपाध्यक्ष शिक्षक विवेक बोढे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
या संपूर्ण फसवणुकीच्या प्रकारावर आमदार, खासदार व पालकमंत्री काय करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
भाजप आज प्रामाणीक पक्ष म्हणून स्वतःला घोषित करतो तर प्रामाणिकपणे ते आपल्या पदाधिकारी शिक्षकांवर कारवाई करणार काय?
