News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, दुचाकी चोरांवर आळा घालण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे झाले होते. Chandrapur crime news
शहर पोलिसांनी या गुन्ह्यात विशेष मोहीम राबवित रेकॉर्डवरील गुन्हेगार दुचाकी चोर अजय उर्फ भूषण शालिग्राम यास महाकाली मंदिर परिसरातून अटक करण्यात आली. Bike theft
आरोपी अजय कडून चोरीच्या 5 दुचाकी जप्त करीत एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur police
सदरची यशस्वी मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंता चुनारकर, चेतन गजलवार, सचिन बोरकर, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, रुपेश रणदिवे यांनी केली.
