News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - तालुक्यात गुंजेवाही मार्गावरील पवनपार समोरील कन्हाळगाव येथे रविवार दिनांक 20 नोव्हेंबर सकाळी दहा वाजताचा सुमारास जंगल परिसरामध्यील शेत शिवाराचा रस्त्यालगत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सिंदेवाही तालुक्यातील पवनपार समोरील कन्हाळगाव शेतपरीसरातील वनक्षेत्र रस्त्यालगत नर जातीचा अंदाजे तीन वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. Wild animals
याबाबत अधिक माहिती अशी कि, सिंदेवाही तालुक्यातील पवनपार समोरील कन्हाळगाव शेतपरीसरातील वनक्षेत्र रस्त्यालगत नर जातीचा अंदाजे तीन वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. Wild animals
या मृत बिबट्याची माहिती उपस्थितांनी जवळील सिंदेवाही वन विभागाला कळविली. माहिती मिळताच येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सालकर यांनी आपल्याकडे असलेले आर.आर. यु. पथक तसेच वन सहाय्यक यांना ताबडतोब घटनास्थळी बोलावले तसेच स्वतः हजर होत. सदर घटनेच्या पंचनामा केला. या मृत बिबट्याचा मृत्यू झुंजी मध्ये झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन परिक्षेत्र अधिकारी सालकर यांनी सांगितलेला आहे. मृत बिबट्याचे सर्व अवयव साबुत असून डॉ. विनोद सुरपाम पशुधन विकास अधिकारी सिंदेवाही हे बिबट्याचे शवविच्छेदन केले असल्याची माहीती देण्यात आली. Leopard