News34 chandrapur
चंद्रपूर: तुम्ही साडी नेसल्यावर, सलवार सूट परिधान केल्यावर चांगले दिसता आणि काही नाही परिधान केल्यावरही चांगले दिसता असे महिलांना उद्देशून जे अप्पतीजनक विधान योगगुरू रामदेव बाबा यांनी केले त्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्ष संध्या सवालाखे यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस (ग्रामिण) च्यावतीने शनिवार दि. २६ नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
Insulting women
ढोकाली येथील हायलँड भागात शुक्रवारी पतंजली योगपीठाच्या वतीने आयोजित महिला योग संमेलनात हे विधान रामदेव बाबा यांनी केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) यासुद्धा उपस्थित होत्या. रामदेवबाबा यांच्या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटत असून चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात हे आंदोलन करण्यात आले.
Ramdev baba controversial statement
रामदेव बाबांच्या या विधानाचा तीव्र निषेध करत रामदेवबाबांनी सर्व महिला वर्गाचा अपमान केला आहे, एका संत म्हणणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून हे विधान शोभत नाही त्यामुळे ते संत नसून असंत आहे. रामदेव बाबा याने संत या शब्दाला काळिमा फासला आहे. त्या मुळे आज त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करून त्याच्या प्रतिमेला काळे फासले आहे. आपण सुद्धा महिलेच्या गर्भातून जन्म घेतला हे रामदेव बाबा विसरले आहेत म्हणून त्यांनी महिलां विषयी इतके आपत्तीजनक व खालच्या पातळीचे वक्तव्य केले असा हल्लाबोल जिल्हाध्यक्ष ठेमस्कर यांनी यावेळी केला. सोबतच जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी यांच्या कडे रामदेव बाबा यांच्या विरोधात लेखी तक्रार सुद्धा देण्यात आली आहे. अशी माहिती देखील यावेळी दिली.
Chandrapur mahila congress
या आंदोलनाला सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष लता बारापात्रे, सिंदेवाही च्या तालुका अध्यक्ष सीमा सहारे,गोंडपीपरी च्या तालुका अध्यक्ष रेखा रामटेके, चंद्रपूर सोशल मीडियाचे जिल्हाअध्यक्ष मुन्ना तावाडे,इंजी नरेंद्र डोंगरे प्रीती सागरे, संगीता शंकरपाल, पुष्पा सिडाम, निमंत्रीता कोकोडे, पुष्पा मडावी, नंदा नरसाळे, अंकुबाई भुक्या, छाया शेंडे, नेहा मेश्राम, मंगला शिवरकर, मेहेक सय्यद,सीमा धुर्वे, माला माणिकपुरी, रिया रॉय, शालू दास, ममता मेश्राम, अविनाश मेश्राम, स्वप्नील निमगडे, विजय कांबळे, सारंग चालखुरे, मिलिंद रामटेके, प्रकाश देशभ्रतार, शिवम गोरघाटे, बिराज नारायने यांची उपस्थिती होती.
