News34 chandrapur
चंद्रपूर - बल्लारपुर रेल्वे स्थानक येथे घेडलेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांची रुग्णालयात जाऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेतली असुन उपचारा दरम्याण सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना केल्या आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, युवा नेते अमोल शेंडे, राशेद हुसेन, रुपेश पांडे, नकुल वासमवार, हेरमन जोसेफ, रुपेश कुंदोजवार, सदनाम मिरधा, दिनेश इंगळे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या आरोग्य सेवा पथकाच्या सदस्यांच्या उपस्थिती होती.
Mla kishor jorgewar
पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने १३ प्रवासी जखमी झाल्याची घटना काल बल्लारपूर रेल्वे स्थानकावर घडली. जखमींपैकी ४५ वर्षीय निलीमा रंगारी या महिलेचा मृत्यु झाला आहे. दरम्याण आज चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर जखमींवर उपचार सुरु असलेल्या खाजगी रुग्णालयात जात जखमींची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्या प्रकृतीबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालय प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली आहे. यावेळी जखमींच्या नातलगांशीही आमदार किशोर जोरगेवार यांनी चर्चा करत घटनेबाबत माहिती घेतली आहे. Ballarpur railway over bridge collapsed
सदर पादचारी पुल हा ४० वर्ष जुना होता. त्याची योग्य देखभाल केल्या गेली नाही. सदर पुलाबाबत तक्रारी प्राप्त होऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. ही मोठी चुक असुन याची चौकशी करत दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी रेल्वे विभागाला केली आहे. अपघातात मृत्यु झालेल्या महिलेसह जखमींना शासनस्तरावरुन मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. रेल्वे विभागानेही या प्रकरणाकडे गांर्भियाने लक्ष देत जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांची तपासणी करावी, यासाठी एक पथक रेल्वे विभागाने तयार करावे अशी मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असुन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आलेल्या तक्रारींकडे दूर्लक्ष करु नका अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
