News34 chandrapur
चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर पादचारी पुल कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेतील मृत शिक्षिका निलिमा रंगारी यांच्या कुंटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे जखमींवर योग्य उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. Ballarsha railway junction
Over bridge collapsed
रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट दिली व सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस देखील केली. यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतकाच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रु.चे अर्थसहाय्य प्रदान करण्याची विनंती केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य मृतकेच्या कुटुंबियांना जाहीर केले आहे.
Chief Minister's relief Fund
