सावली (news 34) तालुक्यातील बोथली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नीघालेल्या मीरवणुकीत अपघात होऊन चार जण जखमी झाल्याची घटना घडली. कोरोना प्रतीबंधामुळे दोन वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत नव्हता. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अतीशय उत्साह पुर्ण वातावरणात प्रत्येक गावात मीरवणुक काढण्यात आली. Bhim jayanti
सावली तालुक्यातील बोथली येथे उत्साहात काढलेल्या मीरवणुकीत अनपेक्षित अपघात घडला. बाबासाहेबांचा रथ असलेल्या ट्रॅक्टरच्या चालकालाही मीरवणुकीत नाचण्याचा मोह आवरता आला नाही. Unexpected accident
त्याने ट्रॅक्टर चालुच ठेऊन नाचण्यासाठी खाली उतरला दरम्यान ट्रॅक्टर पुढे असणाऱ्या लोकांच्या अंगावर गेल्याने त्यात चार जण जखमी झाले आहेत. त्यात प्रतीक भारत दुर्गे २२, उषा उमाजी कोसनकर ४५, योगीता सागर खोब्रागडे ३१, सर्व राहणार बोथली. व शालीनी दुर्योधन कुमरे३५ हीरापुर. हे जखमी झाले आहेत. त्यांना जील्हा सामान्य रूग्णालय गडचीरोली येथे भरती करण्यात आले आहे. पुढील तपास सावलीचे ठाणेदार आशीष बोरकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार रामकृष्ण बोधे करीत आहेत.
