News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल नगरातील बसस्थानक येथे मागील अनेक वर्षांपासून श्री.हनुमान मंदिराचे जिर्णोद्वार करण्यात आले असून हे हनुमान मंदिर अनेक भक्तांना पावन आहे. जो भक्त आस्थेने व श्रद्धेने भक्तिभावाने या मंदिरात पूजा अर्चा करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धाळू भक्त नागरिकांची भावना आहे. Hanuman jayanti 2022या हनुमान मंदिराचे जिर्णोद्वार मय्यर मातेचे व हनुमानाचे परमभक्त चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी. प.अध्यक्ष संतोशसिंह रावत यांनी त्यांच्या मातोश्री कमलादेवी चंदनसिंह रावत यांच्या स्मृतिस समर्पित निर्माण करण्यात आले असून या हनुमान मंदिरात बस स्थानका वरुन जाणारे येणारे हजारो भक्तगण मोठ्या श्रद्धेने दर्शन घेऊन जात असतात. Hanuman chalisa
या हनुमान मंदिरात दरवर्षीच हनुमान जयंतीला महापूजा अर्चा आणि महाप्रसादाचे आयोजन श्री. संतोशसिंह रावत यांचेकडून हनुमान मंदिर समितीच्या सर्व सदस्य यांच्या सहकार्याने करण्यात येत असते. यावर्षी देखील हनुमान जन्मोत्सव निमित्य सकाळी ७-०० वाजता अभिषेख व पूजा आणि ११-०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मुल वासीय जनतेनी, या पावन मूर्ती हनुमानाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान मंदिराचे जिर्णोद्वार संतोशसिंह रावत यांनी केले आहे.

