News 34 chandrapur
मुंबई/चंद्रपूर - हनुमान चालीसा इथे नाही म्हणायचं तर का पाकिस्तानात जाऊन म्हणायचं काय? असा प्रश्न उपस्थित करीत महाविकास आघाडी सरकारवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला. treason
राणा दाम्पत्याने मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असे म्हटले होते, आंदोलन करू असे म्हटले नाही. Devendra fadanvis
मात्र महिला खासदाराला थांबविण्यासाठी झुंडशाही पद्धतीने दबाव आणण्याचे काम सध्या मुख्यमंत्री कार्यालयामार्फत सुरू आहे. Mahavikas aghadi government
राज्यातील कायदा व सुव्यवस्था तडीस निघत आहे त्याला जबाबदार गृहमंत्री आहे. Injustice on Rana couple
केरळ व पश्चिम बंगाल मध्ये सत्ताधाऱ्यांनी अशीच झुंडशाही करीत भाजप कार्यकर्त्याना ठार केले मात्र हा महाराष्ट्र आहे आम्ही इथे अशी झुंडशाही खपवून घेणार नाही. Hanuman chalisa
हनुमान पठण करू असे म्हटल्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, हनुमान चालीसा मी म्हणतो माझ्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून दाखवा असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
महिला खासदार नवनीत राणा यांना पोलीस कस्टडीमध्ये हीन दर्जाची वागणूक केली जात आहे, याबाबत नवनीत राणा यांनी लोकसभा सभापती ला तक्रार दिली आहे.
सरकार जर अशी हुकूमशाही करीत असेल तर आम्हाला सरकार विरोधात संघर्ष करावा लागेल.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 वाजेनंतर डीजे असो की भोंगे हे वाजणार नाही असे निर्देश असताना त्याचे पालन होताना दिसत नाही आहे.
जेव्हा हिंदू धर्मियांनी उच्च न्यायालयाचा निर्णयाचा मान ठेवला तर बाकी धर्मियांनी सुद्धा कोर्टाचा मान ठेवावा.
