चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गापूर पोलिस ठाणे हद्दीतील ऊर्जानगर येथील बँक ऑफ इंडियाची शाखा अज्ञात चोरट्यांनी फोडली. ही शाखा शनिवारी किंवा रविवारी सुट्टीच्या दिवसात फोडण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज बँकेचे शाखा व्यवस्थापक योगेश चौधरी व दुर्गापूर पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बँकेच्या मागील दरवाजाचे चोरट्यांनी कुलूप तोडून शाखेच्या आत प्रवेश केला. मात्र, त्यांच्या हाती कुठल्याही प्रकारची रोकड किंवा दागिने लागले नाही. केवळ सुरक्षा रक्षकाची बंदूक अर्थात गन त्यांच्या हाती लागली. ती 12 बोअरची बंदूक घेऊन चोरटे पसार झाले. Bank of india urjanagar branch

आज सोमवारी बँकेच्या वेळेनुसार बँक कर्मचारी व अधिकारी बँक शाखेत पोहचले.तेव्हा बँकेच्या मागील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. Attempted robbery
बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बँकेतून काही रोकड चोरी गेली की काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला होता. Security guard's gun stolen
लागलीच याबाबतची माहिती दुर्गापूर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार स्वप्निल धुळे यांच्यासह त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून दुर्गापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध 454, 457, 380 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बँक अज्ञात चोरट्यांनी फोडली असून, बँकेतील सुरक्षारक्षकाच्या बंदूकी शिवाय अन्य कुठलेही साहित्य किंवा रोकड चोरीला गेली नसल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक योगेश चौधरी यांनी दुर्गापूर पोलिसात नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहेत.