News34 Chandrapur
चंद्रपूर जिल्हा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात आहे.यातून बाहेर पडण्यासाठी विविध उपाययोजना शासनस्तरावर व जनतेमार्फत केल्या जात असताना चंद्रपूर महाऔष्णिक विद्युतकेंद्राने एक पाऊल पुढे टाकत पर्यावरणाच्या रक्षणासाठी 'Zero discharge policy 'चा स्विकार केल्याने,इरई नदीतील प्रदूषणाला कायमचा ब्रेक लागला आहे.70 दलघमी पाण्याचा पुनर्वापर होत असल्याने,हा विषय चर्चेचा ठरला आहे.
Ash pollution
असे केले पाणी व राखेच्या प्रदूषणावर नियंत्रण
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात 1600घ.मी / तास, 500 घ.मी / तास, 100 घ.मी. / तास, 675घ.मी / तास कार्यक्षमता असलेले एकूण 4 इन्फ्लुएन्ट ट्रीटमेंट प्लांट (ईटीपी )तसेच 240 घ.मी / तास व 01 घ.मी / तास कार्यक्षमता असलेले एकूण 2 सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट (एस.टी.पी) कार्यरत आहेत. या ई.टी.पी. व एस. टी.पीत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या पाण्यावर व कॉलनीतून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा उपयोग राखेची स्लरी बनवून राख ऍशबंडला वाहून नेण्याकरिता केला जातो. हि राखेची स्लरी वाहून नेण्याकरिता एकूण 17 पाईप लाईन चे प्रयोजन आहे. या लाईनची देखरेख करण्याकरिता 24 तास कार्यरत पथक नेमलेले आहे. या लाईनचे लिकेज झाल्यास मेंटेनन्स विभागाकडून त्वरित लिकेज आटोक्यात आणल्या जाते.
चंद्रपूर म.ओ.वि.केंद्र 4 ई.टी.पीतून निघणाऱ्या पाण्याचे परीक्षण व विश्लेषण नियमितपणे करीत असते व मासिक अहवाल म.प्र.नि.मंडळ, चंद्रपूरला सादर करीत असते, जे प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या मानकांच्या मर्यादित असते.या यंत्रणेतील ऑनलाइन डाटा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वरला 24 तास जोडलेला आहे.
राखेच्या प्रदूषणाच्या नियंत्रण ईएसपी मधून काढलेली राख सिमेंट व विट कंपनीला दिली जाते आणि उरलेली राख ऍशबंड येथे साठवली जाते.या बंड मधील साठविलेल्या तसेच भविष्यात तयार होणाऱ्या राखेची विल्हेवाट लावण्याकरिता या राखेचा उपयोग बंद झालेल्या तेलवासा, ढोरवासा आणि नवीन कुनाडा या कोळश्याच्या खाणींना बुजविण्याकरिता करण्यात यावा यासाठी चं.म.औ.वि. केंद्राने वे.की.लि. पुढे प्रस्ताव मांडलेला आहे व त्या दिशेने वाटचाल सुरु झालेली आहे.तसेच राखेच्या उपयोग वाढविण्याकरिता रेल्वेद्वारे राख वाहून नेण्याचे उपक्रम सुरु झालेला आहे.
केंद्राच्या परिसरात प्रदूषण नियंत्रणासाठी दरवर्षी वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. आतापर्यंत 1315760 झाडे लावण्यात आलेली आहेत. मोकळ्या जागेच्या 48.77% जागा ही वृक्षाने व्यापलेली आहे.त्यामूळे कायरकर यांनी लावलेले आरोप निराधार व भ्रम निर्माण करणारे आहे,अशी स्पष्टोक्ती सिटीपीएसचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी दिली. Chandrapur thermal
