चंद्रपूर - 13 फेब्रुवारीला राज्याचे
पर्यटन व पर्यावरण मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे चंद्रपूर दौऱ्यावर आले होते. Tourism, environment minister
यावेळी महिला आघाडी पूर्व विदर्भ संगठिका शिल्पाताई बोडके, शिवसेना संपर्कप्रमुख प्रशांत कदम व शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांची उपस्थिती होती. Shivsena chandrapur
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच स्वागत शिवसेना कार्यकर्त्यांनी केल्यावर उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी आदित्य ठाकरे यांनी पुढील निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहत प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहावे, आज मी शासकीय कामानिमित्त चंद्रपूरला आलो आहे पुढच्या वेळी निवडणुकीत विजय संपादन केल्यावर मला विजयी रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी आपण बोलवा, मी नक्की येणार.
आपण सर्वांनी एकत्र येत येणाऱ्या निवडणुकीत आपली ताकद दाखवावी पक्ष आपल्याला पूर्णपणे सहकार्य करेल.
आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शन नंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी संचारली.
