चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना काही ठिकाणी कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. Lohadi
अश्यात लोहारा येथील हॉटेल ग्रीन पार्क येथे कसलीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात पंजाबी समाजाचा लोहरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात 70 ते 80 नागरिक उपस्थित होते.
मास्कचा वापर न करता नागरिक बेधुंदपणे कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. Hotel green park
सदर कोरोना नियमांचे उल्लंघणाची माहिती रामनगर पोलिसांना प्राप्त झाली. Corona rule violation
रामनगर पोलिसांनी हॉटेल मालक, कार्यक्रमाचे आयोजन व डीजे चालकांवर कारवाई करीत हॉटेल मॅनेजर सावन पोंकटवार यांचेवर 50 हजार, कार्यक्रमाचे आयोजक संदीप सिंग बोपारा यांचेवर 12 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी
नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्बल अकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा मरसकोल्हे, पोहवा प्रंशात शेंदरे, नापोशि पुरुषोत्तम चिकाटे, नापोशि विनोद यादव, नापोषि पेतरस सिडाम, नापोशि किशारे वैरागडे, नापोशि आंनद खरात, नापोषि पांडुरंग वाघमोडे, नापोशि निलेश मुडे, नापोशि सतिय अवथरे, पोशि विकास जुमनाके, पोशि माजीद पठान, पोशि संदिप कामडी, पोशिं हिरालाल गुप्ता यांनी केली आहे.