गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना नगरपंचायतीच्या निवडणूकीत विजय बावणे यांनी पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे.नितीन विजय बावणे यांनी राजकारणात दमदार ''एन्ट्री'' करीत ''काका'' ला चित केले आहे. काँग्रेस विरूद्ध इतर सर्व असा सामना असल्याने जिल्ह्याचे लक्ष कोरपना नगरपंचायत निवडणूकीच्या निकालाकडे लागले होते. 19 जानेवारीला लागलेल्या निकालात काँग्रेसने तब्बल 12 जागा जिंकल्या असून बीजेपी,संघटना शिवसेना आणि इतरच्या गटाला फक्त 5 जागावर समाधान मानावे लागले आहे. Congress make a history
शंकरराव गिरडकर यांची सून टीना गिरडकर यांना फक्त 8 मतांनी पराभव पत्करावा लागला असून गीता डोहे विजय झाल्या आहे.प्रभाग क्रं.1नंदाताई बावणे 233,विजय मसे 106.प्रभाग क्रं.2,मनीषा लोडे 245,नीता मुसळे 105,प्रभाग क्रं.3,नितीन बावणे 163,किशोर बावणे 80,प्रभाग क्रं.4 इस्माईल शेख 109,शुभम झाडे 68,प्रभाग क्रं.5,शेख निसार 108,सुहेल अली 103,प्रभाग क्रं.6 देविका पंधरे 126,पूजा देरकर 120,प्रभाग क्रं.7 मनोहर चन्ने 80,शारीक अली 60,प्रभाग क्रं.8,जोशना खोबरकर 158,जोशना वैरागडे 93, प्रभाग क्रं.9 मोहम्मद शादुल 86,पवन बुर्रेवाव 79 प्रभाग क्रं.10, लक्ष्मण पंधरे 133,सुभाष आत्राम 92,प्रभाग क्रं.11,सोनाली बुर्रेवार 109, वर्षा लांडगे 131,प्रभाग क्रं.12,मंगला पारखी 85,आशा झाडे 163,प्रभाग क्रं.13,संगीता पंधर 86,सविता तुमराम 108, प्रभाग क्रं.14 राधिका मडावी 117, जया मेश्राम 68, प्रभाग क्रं. 15,टीना गिरडकर 119, गीता डोहे 127, प्रभाग क्रं.16, दिलीप जाधव 98, सुभाष हरबडे 110,प्रभाग क्रं.17 आरीफा शेख 98, वहीदा हुसैन 45 याप्रमाणे निकाल घोषित झाले आहेत. Nagrpanchayat election result
