प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मागील नोव्हेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने मुल व सावली तालुक्यातील धान पिकाचे फार मोठे नुकसान केले. सतत पाच सहा दिवस शेतकऱ्यांचे कापलेले धान पाण्यात बुडन राहिल्याने धान कोणी घायला तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप पीक हातातून गेले. शेतकरी हवालदिल झाला. परंतु रब्बी पिकामध्ये तूर,हरबरा,गहू, उडीद, लाख, आणि हिवाळी भाजीपाला मोठ्या प्रमाणात लागवड केली. Untimely rain vidarbhaभाजीपाल्यात वांगे, टमाटर, मिरची,कोबी, चवळी, भेंडी, कोहळा, कारली,गवार पालेभाज्यात मेथी, मुळा,पालक,सांभार, चवळी माठ, नायलान शेंगा, भरपूर प्रमाणात लागवड केली आहे परंतु नुकत्याच आलेल्या अवकाळी पावसाने लावलेली रोपे खाली वाकून पडून गेली असल्याने पुन्हा दुबार रोपे लावण्याची पाळी आलेली आहे तसेच ज्यांनी सुरवातीलाच लागवड केली त्यांचा भाजीपाला vegetables निघायला सुरुवात झाली असतांनाच अवकाळी पावसामुळे संपूर्ण झाडे वाकून गेल्याने लागलेली मिरची, वांगे,शेंगा आणि वाफे भुईसपाट झालेली आहेत. त्यामुळे मुल सावली तालुक्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि धुके ढगाळ वातावरण रब्बी पिकासाठी नुकसान ठरणारे आहे. शेतकऱ्यांना खरीप पीक हातून गेल्यामुळे रब्बीपिकाकडे लक्ष घालून पैसे खर्च करून मेहनत घेऊन खरीप पिकाची भरपाई रब्बी पिकामध्ये काढावी या हेतूने बिचाऱ्या शेतकऱ्यांनी जोमाने भिडले परंतु निसर्गानेच यावर्षी शेतकऱ्यांना मारले आहे. खरीप गेले,रब्बीही गेले तर हातात काय उरले या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतातरी धीर देण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले तरच शेतकरी जीवित राहील अन्यथा शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही असे शेतकरी बांधव बोलू लागले आहे. शेतकऱ्यांचे जीवन शासनाच्या हातात शिल्लक राहिले आहे.
