प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - स्पोर्टी सर्विस सोसायटी आंध्रप्रदेश तर्फे महाराष्ट्रातील समाजसेविका सरिता मालू यांचा गौरव करण्यात आला सरिता मालू या लोकप्रिय सामाजिक कार्यकर्त्या असून ते फ्रेंड्स चारिटी ग्रुपचे अध्यक्ष आहेत. Friends charity groupचंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये समाजसेवेचे काम यांनी केलेले आहेत, या संपूर्ण कार्याची दखल घेता तसेच सरिता मालू यांनी गेल्या अनेक वर्षापासून गरीब आणि निराधार महिलांना शिवणकामाची मशीन देऊन रोजगार दिलेला आहे अपंग मुली ना लग्न करून गरीब महिलांना आर्थिक सहाय्य केलेले आहे आणि त्यांच्या संगोपनासाठी व्यवस्थापन केलेली आहे यासारख्या अनेक उल्लेखनीय सामाजिक कामे सरिता मालू यांनी केले आहे हे कामे पाहून सर्विस सोसायटी तर्फे त्यांना गौरविण्यात आलेले आहे या कार्यक्रमात चे आयोजन हैदराबाद येथे केले असून या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री मिनिस्टर तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय लीडर नरेंद्र भास्कर राव उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत व त्यांच्या स्वहस्ते सरिता मालू यांना गौरविण्यात आले, कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर समुद्रा वेणुगोपाल माजी सेंट्रल मिनिस्टर सीनियर लीडर होते. तसेच आपल्या शोभा रेड्डी नाम फाउंडेशन तसेच पवन सोनी फिल्म प्रोडुसर मान्यवर यांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यांनी दिलेल्या पुरस्कारा बद्दल सरिता मालू यांनी सस्नेह आभार वेक्त केलं आहे.