चंद्रपूर - चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहन चोरीच्या घटनेत वाढ झाली होती, दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस याव्या या साठी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सदर गुन्हे उघडकीस यावे यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे वळते करीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना याबाबत निर्देशित केले.
स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करीत वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला असता तपासादरम्यान एक इसम काळ्या रंगांची मेस्ट्रो मोपेड विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली, याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत त्या इसमाला अटक केली.
याबाबत अधिक तपास केला असता सदर दुचाकी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले, सखोल चौकशी केली असता त्या इसमाने आपल्या साथीदारासोबत मिळून तब्बल 11 दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले.
त्यांच्या दुचाकी चोरीची पद्धत ही कुणी दुचाकी पार्किंग मध्ये ठेवली असता आरोपीची मैत्रीण ही त्या दुचाकीला धक्का मारत ठरलेल्या ठिकाणी नेत असत व त्यांचा तिसरा साथीदार दुचाकीच्या डुप्लिकेट चाव्या बनवीत होता. चोरी केलेल्या सर्व दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेट सुद्धा बद्लविण्याचे काम आरोपीनी केले असल्याचे कबूल केले.
आरोपींकडून रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतून 5 दुचाकी, शहर हद्दीतून 3 दुचाकी, बल्लारपूर येथील 1 व इतर ठिकाणाहून 2 दुचाकी अश्या एकूण 11 दुचाकी जप्त करीत 6 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Bunty Bubbly arrested in chandrapur
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, चंद्रपूर याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनी जितेन्द्र बोबडे, पो.उप नि सचिन गदादे, पो.हवा संजय आतकुलवार, पो.कॉ. नितीन रायपूरे, गोपाल आतकूलवार, कुंदन बावरी, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, म.पो.शि. अपर्णा मानकर यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.
