चंद्रपूर - चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी तर्फे आज दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांच्या जयंतीनिमित्त जनजागरण पदयात्रा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ही पदयात्रा नेहरू कॉलेज येथून काढण्यात आली व संपूर्ण घुटकाळा, रेहमत नगर परिसरात भाजपा सरकारच्या जाचक महागाईविरोधात जनजागृती करून याची सांगता नेहरू चौक येथे करण्यात आली. Chandrapur congress
या कार्यक्रमाला चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे प्रभारी मा. किशोरजी गजभिये व चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला, काँग्रेसचे नगरसेवक, चंद्रपूर जिल्हा व शहर महिला काँग्रेस, अनुसूचित विभाग, ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक विभाग, सांस्कृतिक विभाग, इंटक काँग्रेस, प्रोफेशनल काँग्रेस तसेच सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन चे पदाधिकारी, शहर (जिल्हा) काँग्रेसचे कमिटीचे सर्व पदाधिकारी व सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
