वरोरा - वरोरा तालुक्यातील भटाला व आसाला शेत शिवारात शेतकरी नामदेव कटू गराडे वय 70 वर्ष हे शेतात कापूस वेचत असतानी आज दुपारी 1 वाजता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जखमी केले सदर वाघाने हल्ला करताच त्या शेतकरी याने आवाज दिला कि "मला वाघाने मारले धावगा" तेव्हा रस्त्यानी जाणारे श्री माणिक मारोती जांभुळे तसेच श्री प्रभाकर नामदेव मगरे आणी मैनाबाई माणिक जांभुळे यांनी त्या वाघाला जखमी शेतकरी पासून हाकलवून लावले आणी त्या शेतकऱ्याला दवाखान्यात रवाना केले.
भर दुपारी झालेल्या वाघाच्या हल्ल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ त्या वाघाचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. Tiger attack in warora
