प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा चंद्रपूर च्या वतीने मुल येथील अतिशय गरीब झोपडपट्टी मध्ये वास्तव्याने राहणाऱ्या वृद्ध दांपत्य श्री. खोब्रागडे यांचा तरुण मुलाचे वालपेंटिंग चे काम करीत असतांना बिल्डिंग वरुन पडल्याने अपघात झाला व त्यात तो मृत्युमुखी पडला. त्याच्या पश्चात त्याची पत्नी (जीला ऐकायला ही येत नाही आणि बोलताही येत नाही) आणि एक वर्षाचा मुलगा असून यांची जवाबदारी खोब्रागडे वृद्ध आई-वडीलांवर आलेली आहे. म्हातारपणामुळे काम मिळत नाही म्हणुन त्यांनी चंद्रपूर जिल्हा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेच्या संघटिका सेवानिवृत्त शिक्षिका कविता मोहुर्ले यांचेशी संपर्क केला असता वृद्ध दाम्पत्याचे वय बघुन काय काम सांगावं असा प्रश्र्न मोहुर्ले मॅडम यांना पडला. लहानसहान काम त्यांना दिलंही, आणि दिवाळी सारख्या सणाचे औचित्य साधून त्यानिमित्त मोहुर्ले मॅडम यांनी त्यांना कपडे आणि फराळ देऊन एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा दाखवून दिला.
याप्रसंगी नागपूर विभाग उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, नागपूर विभाग सचिव रत्ना चौधरी आणि वृद्ध दाम्पत्य श्री. खोब्रागडे यांचे शेजारी बांधव उपस्थित होते. उपस्थितांना सुद्धा फराळाचे साहित्य देण्यात आले. आपल्या संस्थेच्या उपक्रमाबद्दल झोपडपट्टी वासीयांनी आभार मानले.
