गडचांदूर :- कोरपना तालुक्यातील माथा येथे नातेवाईकांना भेटून दुचाकीने जात असताना आसन गावा जवळ रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने एका तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अंदाजे 5,30 च्या सुमारास घडली.महेश नवनाथ बोबडे वय वर्ष अंदाजे 21रा.अहेरी तालुका राजूरा असे मृतकाचे नाव असून पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसला. अती रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती असून घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी हितेंद्र रायपूरे, पोहवा धर्मेंद्र रामटेके,पोना धर्मराज मुंडे यांनी घटना स्थळी गाठून त्याला ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. Deadly potholes on the road
रस्यावर पडलेले मोठमोठे खड्डे नागरिकांना जीवघेणे ठरत असून बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने निष्पापांचे नाहक बळी जात असल्याची जळजळीत भावना व्यक्त होत असून यमस्वरूपी रस्त्यावरील खड्डे अजून किती जीव घेणार असे बोलले जात आहे.
