चंद्रपूर - 2 वर्षांपूर्वी शहरातील लालपेठ परिसरात घडलेल्या संजू जुनमूलवार या युवकाच्या Murder हत्याप्रकरणातील 3 आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून यामधील एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली.
3 जून 2019 ला रात्री 10 वाजताच्या दरम्यान लालपेठ कॉलरी क्रमांक 1 मध्ये आपसी वादात भांडण सोडवायला गेलेल्या संजू जुनमूलवार या युवकाला आरोपी वय 22 वर्षे शिवा उर्फ गोलू पेराबोईनवार, 40 वर्षीय रामा रायमल्लू कोटा, 35 वर्षीय लक्ष्मण रायमल्लू कोटा, 35 वर्षीय संतोषी राम कोटा यांनी संगनमत करून त्याच्या पोटावर कोंबड्याच्या कातीने सपासप वार केले होते, अचानक झालेल्या या हल्ल्यात संजूचे पोट फाटले, रक्ताच्या थारोळ्यात संजू धावू लागला मात्र उपचारादरम्यान संजूचा मृत्यू झाला होता.life imprisonment
या हत्याकांडाची फिर्यादी राजू मोहन गोगलवार यांनी तक्रार दिली, शहर पोलिसांनी या प्रकरणी 302, 324 व 34 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
सदर प्रकरणी अंतिम युक्तिवादात 7 जणांच्या साक्ष तपासल्यावर जिल्हा सत्र न्यायाधीशांनी 15 नोव्हेम्बरला हत्या प्रकरणातील आरोपी शिवा उर्फ गोलू पेराबोईनवार, रामा रायमल्लू कोटा, लक्ष्मण रायमल्लू कोटा यांना दोषी ठरवीत जन्मठेपेची शिक्षा व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्षाचा अतिरिक्त कारावास सुनावण्यात आला. Sanju Junmulwar
सदर प्रकरणाचा तपास पोउपनी व्ही.के. कोरडे यांनी केला तर न्यायालयात सरकारी वकील संदीप नागपुरे यांनी युक्तिवाद केला.
