घुघुस - दिवाळीच्या वेळी नागरिकांनी काळजी घेत सावधानता बाळगावी असा संदेश चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासनाने दिल्यानंतर घुघुस शहरात ऐन भाऊबीजेच्या दिवशी 4 घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या.burglary in ghughus
तसेच रघुनाथ वानखेडे यांच्या घरून चांदीचे दागिने, म्हातारदेवी निवासी डॉ. सुनील दुधे व मुन्ना मेश्राम यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला मात्र त्यांनी काही हाती न लागल्याने चोर खाली हात गेले.
दिवाळीत नागरिकांनी सावध रहावे, बाहेर गावी गेल्यास शेजारी व पोलिसांना सूचना द्यावी असा संदेश पोलीस विभागाने दिला होता.
काही महिन्यांपूर्वी वेकोली वसाहती मध्ये 4 घरी घरफोड्या झाल्या होत्या मात्र त्या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाटचं आहे.
ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ पसरली आहे, पोलिसांपुढे या सर्व घटना आव्हान बनल्या असून घुघुस पोलीस या घटनांवर आळा कधी बसविणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
