चंद्रपूर - विज उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्हाला घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी अशी चंद्रपूरकरांची मागणी आहे. या मागणीचा मी सातत्याने पाठपूरावा करत आहे. मात्र या मागणीच्या पुर्ततेसाठी अपेक्षित असा प्रतिसाद संबंधीत विभागाकडून मिळत नसल्याने सदर मागणीसाठी भविष्यात चंद्रपूरात मोठे जनआंदोलन उभे राहू शकते त्यामूळे नागरिकांची असलेली ही मागणी मान्य करावी अशी मागणी मंचावरुन बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना केली आहे. याच कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही चंद्रपूर जिल्हाला किमान 100 युनिट मोफत देण्यात येईल अशी अपेक्षा उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून व्यक्त केली.
राजूरा, मुल, सावली, चंद्रपूर, आणि चिमूर तालुक्यातीली 33/11 केव्ही उपकेंद्राचे अभासी पध्दतीद्वारे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनूले, जिल्हा परिषदेच्या मूख्य कार्यकारी अभियंता मिताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे, महावितरनचे अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे आदींची मंचावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर हा वनआच्छादन व वनांच संरक्षण करणारा जिल्हा असतांनाही केवळ येथील औष्णीक विज केंद्रामूळे येथे प्रदुषण सर्वाधिक आहे. याचा मोठा दुष्परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामूळे याचा मोबदला म्हणून येथील नागरिकांना 200 युनिट विज मोफत देण्यात यावी अशी रास्त मागणी चंद्रपूरकरांची आहे. या मागणीचा अभ्यास केल्यास केवळ 54 मेगाव्हॅट विज चंद्रपूरकरांना मोफत दयावी लागणार आहे. त्यामूळे जवळपास साडेपाच हजार मेगाव्हॅट विज तयार करणा-या जिल्हाला 54 मेगाव्हॅट विज निशुल्क देणे सहज शक्य आहे जी उत्पादनाच्या केवळ १% आहे. त्यामूळे ही मागणी सहज पूर्ण करता येणारी असल्याचे ते यावेळी म्हणाले, तसेच सदर मागणी मान्य न झाल्यास विद्युत निर्मिती करुनही मुंबई, पुणे या जिल्हांच्या दरातच आम्हाला विज विकत घ्यावी लागत असल्याची भावणा येथील नागरिकांमध्ये निर्माण होऊ शकते यातून भविष्यात मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या समक्ष बोलत 200 युनिट मोफत देण्याची मागणी यावेळी ठामपणे मांडली. 200 unit free
2 वर्षात आमदार जोरगेवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना चंद्रपूर जिल्ह्याला 200 युनिट मोफत देण्याची मागणी केली, सर्वात आधी ही मागणी आमदार जोरगेवार यांनी राज्यपाल कोशारी यांचेकडे केली होती, वीज उत्पादनात अग्रेसर असलेल्या जिल्ह्याला 200 युनिट ची मागणी रास्त आहे, मात्र ही मागणी करताना आधी शहराची दुर्दशा काय? रस्त्यांची अवस्था कशी झाली आहे? याकडे आपलं लक्ष गेलं की नाही, बाबूपेठ येथील विद्युत भवन येथे अनेक वीज उपकेंद्राच्या आभासी उदघाटन कार्यक्रमाला ऊर्जामंत्री राऊत यांनी हजेरी लावली, मात्र तिथे जाणाऱ्या रस्त्याचं काय? मागील अडीच वर्षांपासून अंचलेश्वर गेट ते राजीव गांधी महाविद्यालय पर्यंतचा मार्ग पूर्णतः खड्ड्यात गेला त्यासाठी आजपर्यंत पाठपुरावा करायला कुणाला वेळ मिळाला नाही, मध्यंतरी तो मार्ग मंजूर झाला असे बॅनर त्या मार्गावर लावण्यात आले होते मात्र त्या गोष्टीला 3 महिने होऊन गेले.
अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले आमदार व अनुसूचित विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत आज त्या मार्गाने गेले, मुळात तो मार्ग दलित वस्तीकडे जाणारा आहे.
मात्र दुर्दैवाने तो भाग व मार्ग विकासापासून मागासलेला आहे.
तसेच यावेळी आ. जोरगेवार यांनी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर होत आहे. अशात रस्त्याकडेला उभे असलेल्या विद्युत खाबांमुळेही वाहतुक प्रभावित होत आहे. ही बाब लक्षात घेता शहरात भुमिगत विद्यूत जोडणी करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना केली आहे. सोबतच नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार होत असलेल्या पागल बाबा नगर येथ आणि वडगाव येथे नवीन उपकेंद्र तयार करण्याची मागणीही यावेळी बोलतांना त्यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना केली.
