चंद्रपूर - 30 ऑक्टोम्बरला रात्री 10 वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावर असलेल्या चारचाकी शोरूमच्या मोकळ्या जागेत एका युवकाने भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली.
याप्रकरणी प्यार फाऊंडेशन ने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली, पोलिसांनी आरोपी प्रकाश डाफ आजनसरा, हिंगणघाट निवासी तरुणाला अटक केली आहे. unnaturally abused the stray dog
प्रकाश डाफ या विकृताने रस्त्यावर भटकंती करणाऱ्या कुत्रीला वाहन शोरूमच्या मोकळ्या जागेत नेत अनैसर्गिक अत्याचार केला.
सदर घटनेची माहिती प्यार फाउंडेशनच्या Pyar Foundation सदस्यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत त्या भटक्या कुत्रीची सुटका केली, व याबाबत रामनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, आरोपी विकृत तरुण प्रकाश डाफ वर रामनगर पोलिसांनी 377 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
