कोरपना - फिर्यादी व पत्नीच्या नावे असलेली शेतजमीन वर्ग 1 मध्ये नोंद करण्याच्या कामासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची नक्कल प्रत देण्यासाठी कोरपना तहसील कार्यालयातील अव्वल कारकून 57 वर्षीय विलास रामाजी ठमके यांनी फिर्यादीला 2500 रुपयांची लाच मागितली. Acb chandrapur
फिर्यादीला लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे दिली.
पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे व पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी सदर प्रकरणाची पडताळणी करीत सापळा रचला.
अव्वल कारकून विलास ठमके यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी खाजगी इसम 23 वर्षीय प्रदीप आदे यांना पाठविले. Korpana trap
2500 रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने आदे यांना रंगेहात अटक केली.
आदे यांनी सदर पैसे हे अव्वल कारकून ठमके यांना देण्याचे कबूल केले.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, मिलींद तोतरे, अपर पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. परिक्षेत्र नागपूर, अविनाश भामरे, पोलीस उप-अधीक्षक, ला. प्र. वि. चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा भरडे, नापोकॉ. संतोष येलपूलवार , पो.कॉ. रविकुमार ढेंगळे,संदेश वाघमारे, वैभव गाडगे, चा.पो.शि सतीश सिडाम, सर्व ला.प्र.वि. चंद्रपूर यांनी पार पाडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला कुणीही शासकीय अधिकारी व कर्मचारी लाच मागत असेल तर त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांनी केले आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेम्बर पर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्यतर्फे भ्रष्टाचार निर्मूलन समिती तर्फे जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे.
लाच देणे व घेणे हा गुन्हा असून याबाबत कुणाचीही तक्रार असल्यास त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग 07172-250251, टोल फ्री क्रमांक - 1064 व पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे - मो- 8888824599 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
