प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - कळमना गावातील 2 शेतमजूर 57 वर्षीय अंबादास रामा दुधकोहळे व पुंडलिक शंक खाडे हे सकाळी 8 वाजताच्या सुमारास आपल्या बैलबंडीने शेतात फवारणी करण्यासाठी निघाले असता कळमना-आलापल्ली मार्गावर सिमेंट ची वाहतूक करणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच 34 एबी 5959 ने बैलबंडीला जोरदार धडक दिली. Accidentया धडकेत दोन्ही शेतमजूर सहित एक बैल जागीच ठार झाले, घटनेनंतर वाहनचालकाने ट्रकसहित तिथून पळ काढला. 2 farmer die
अपघाताच्या या घटनेनंतर संतप्त झालेल्या कळमना गावातील गावकऱ्यांनी कळमना-आलापल्ली मार्ग मागील 4 तासापासून बंद करीत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. Road block
घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून आरोपी वाहनचालकाचा पाठलाग करीत पोलिसांनी ताब्यात त्याला ताब्यात घेतले आहे.
कळमना गावात सध्या तणावाची स्थिती असून अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार गावकऱ्यांची समजूत काढत आहे.
अजूनही कळमना मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहे.
