चंद्रपूर- दीपक वरेकर विषय शिक्षक चंद्रपूर प.स अंतर्गत जि प उ प्रा शाळा नागाला (म) येथून नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यानिमित्याने संताजी जगनाडे सभागृह चंद्रपूर येथे निरोप व सत्कार समारंभाचे आयोजक मित्र विजय भोगेकर, अशोक दहेलकर व देवेन्द्र गिरडकर ह्या त्रिमूर्तींनी केले. हा सोहळा बहारदार व आगळावेगळा असा संपन्न झाला.
सेवासुरवतीपासून म्हणजे 34 वर्षापासून प्रेम,विश्वास,कर्तृत्व व मित्रत्वाच्या अतूट धाग्याने बांधलेल्या प्रेमाची अपूर्व भेट यावेळी मिळाली असे विचार वर्हेकर यांनी व्यक्त केले. अनुभव कथन करताना दीपक वर्हेकर यांनी आयुष्यभर असंख्य माणसे जोडली व मोठा मित्रपरिवार जमविला व पुरोगामी शिक्षक समितीला वाढविण्यात व तिचा विस्तार करून असंख्य कार्यकर्ते तयार करण्याचे काम स्व.आर.जी.भानारकर सर यांचे मार्गदर्शनात त्यांनी केले असे विचार वक्त्यांनी व्यक्त केले. unique retirement ceremony
कार्यक्रमात दीपक व सौ.जयश्री वर्हेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला,विस्तार अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, पदवीधर व केंद्रप्रमुख संघटना, ग्रेडपात्र संघटना,प्रहार शिक्षक संघटना, व मित्रमंडळी यांचे वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दीपक वरेकर यांच्या कौटुंबिक जीवनावर मुलगा तुषार व मुलगी ऋचा व वैशाली पाचघरे यांनी मनोगत मांडले, फुलचंद खोब्रागडे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी,अरुण काकडे उपशिक्षणाधिकारी जि.प.चंद्रपूर, नारायण कांबळे जिल्हाध्यक्ष, हरीश ससनकर राज्य सरचिटनिस, अल्काताई ठाकरे राज्याध्यक्ष महिला मंच,नरेश सकंडे, किशोर आनंदवार, आनंदराव बावणे, प्रतिभाताई भोगेकर, सुनील कोहपरे व कार्यक्रमाचे आयोजक
यांनी अनुभव कथन केले.
कार्यक्रमाला मा बाबुराव मडावी गटशिक्षणाधिकारी चंद्रपूर, टी.एम.कुचनकर गटशिक्षणाधिकारी वरोरा, मनोज गौरकार शिक्षण विस्तार अधिकारी, जे डी पोटे, नारायण कोटकर, नागेश सुखदेवे, शुद्धोधन मेश्राम, सुरेश वासेकर, अनिल दागमवार, राजू लांजेकर,संजय निकेसर अन्य संघटना पदाधिकारी, जिल्हा जिल्ह्याबाहेरील मित्रमंडळी व जुळलेल्या व जोडलेल्या मित्रमंडळींच्या साक्षीने हा सोहळा अधिक भावनाप्रधान झाला उपस्थित मंडळी ला निरोप देतांनाअनावर झालेली भावूकता लपवूनही लपविता आली नाही.
अशा आगळ्यावेगळ्या व भावनाप्रधान सोहळ्याचे अतिशय सुंदर व बहारदार संचलन केले ते एकता बंडावर यांनी कार्यक्रम संपल्यानंतरही चर्चा होती ती बहारदार व रंगतदार सोहळ्याची व संचलनाची.
