गडचांदूर :- गडचांदूर येथील जेएमडी कला अकादमीच्या वतीने तालुकास्तरीय ऑनलाइन Online डांडिया व गरबा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात एकूण पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा २३ आक्टोंबर रोजी पार पडला.अध्यक्षस्थानी गडचांदूर न.प.उपाध्यक्ष शरद जोगी होते तर उदघाटन नगराध्यक्षा सौ.सवीता टेकाम यांच्या हस्ते झाले. नगरसेविका सौ.मिनाक्षी एकरे,समाजसेवक मनोज भोजेकर,वैभव गोरे,शुभम संकुलवार,विनोद एकरे, तुकाराम चिकटे,सोमेश्वर सोनकांबळे,श्री ढेगळे,हरी मोरे,शेख कालू भाई,प्रेम वाघमारे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.यावेळी "कपल एकल" या स्पर्धेचे पारितोषिक वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संचालन मयुर एकरे,प्रास्ताविक अतूल गोरे तर आभार प्रवीण गुरनुले यांनी व्यक्त केले. कर्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज इटनकर,पराग गौरकर,सोनू मेश्राम,अनील शेंडे,नितेश सोनुले,स्नेहल बोरूले यांनी परिश्रम घेतले.
