चंद्रपूर - 12 ऑक्टोम्बरला पडोली स्थित MIDC येथे एका गोदामावर स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषधी प्रशासनाने धाड मारीत 4 लाख 19 हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त केला होता. Virul call
या प्रकरणी तंबाखू माफिया वसीम झिमरी ला अटक ही करण्यात आली, मात्र काही दिवसांनी समाज माध्यमांवर ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. Youth congress
चंद्रपुरातील युवक कांग्रेस पदाधिकारी नौशाद व रब्बानी यांच्या मधील ती कॉल रेकॉर्डिंग होती.
कॉल रेकॉर्डिंग मध्ये काही विशेष बाबी नसल्या तरी युवक कांग्रेसचा पदाधिकारी नौशाद हा समोरील रब्बानी ह्या व्यक्तीला तक्रार मागे घेण्यास सांगत होता.
म्हणजेच कुणीही सुगंधित तंबाखू माफिया विरोधात तक्रार करीत असेल तर त्याला मॅनेज करण्याचे काम नौशाद करीत होता.
युवक कांग्रेस मधील प्रत्येक पदाधिकारी याची निवड निवडणुकीद्वारे होते, मात्र हा युवक कांग्रेस मधील नौशाद कोण याचा शोध सुरू असला तरी कांग्रेसचे पदाधिकारी त्याला चांगलेच ओळखतात.
युवक कांग्रेस सुगंधित तंबाखू माफियाच्या खंदा समर्थक नौशाद ह्यावर कारवाई करणार काय? की गप्प बसणार? यावर आता कांग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
