प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान राष्ट्रमाता इंदिराजी गांधी Indira Gandhi यांच्या स्मृतिदिन सदभावना दिन म्हणून साजरा करण्यात आला. तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, मुल तालुका सरपंच संघटनेच्या तालुका समितीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अखिल गांगरेड्डीवार, संचालक शांताराम कामडे, कांग्रेस युवा कार्यकर्ते अतुल गोवर्धन, जानाला येथील कांग्रेस सक्रिय कार्यकर्ते धनराज रामटेके, व ग्रामस्थ यांचेसह ग्रामीण कांग्रेस निष्ठावान कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मुल नगरातील अनेक वार्डातील कांग्रेस कार्यकर्ते यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून राहून राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे cdcc bank chandrapur अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी स्व.इंदिराजी गांधी यांनी सलग १६ वर्ष भारताच्या पंतप्रधान राहून सर्वांना समान न्याय मिळवून देण्यासाठी झटल्या आणि भारतात राष्ट्रीय एकात्मता व अखंडता टिकून राहावे यासाठी देशातील समस्त देश बांधवांनी संघटित राहावे असा संदेश जनतेला दिला. असल्याच्या आठवणींना उजाळा दिला.
