News 34 Mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- शेतकऱ्यांच्या हक्काची बँक असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाती घेतले आहे. तेंव्हापासूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कँसर cancer व दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या गंभीर रूग्णांना,शेतकरी कल्याण निधी मधून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे काम करीत आहे. आतापर्यंत अनेक कॅन्सरग्रस्त व दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना बँकेतर्फे आर्थिक आधार देऊन अनेक रुग्ण उपचार करुन बरे झाले आहेत. यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी बंधूनी बँकेच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकांनी आपले खाते CDCC Bank Chandrapur बँकेत काढावे असे आव्हान केले. Farmers Welfare Fund
मुल येथील वार्ड नगर सेवक श्री. महेंद्र दिवाकर करकाडे यांना हृदय विकाराचा गंभीर आजार झाल्याने बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून उपचारासाठी चाळीस हजार (४००००/-) रुपयांचा चेक CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी प्रत्यक्ष रुग्णांच्या घरी जाऊन झालेल्या आजाराची विचारपूस करुन उपचार होत असलेली ट्रीटमेंट फाईल पाहून योग्य डाँक्टरकडे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. व हिम्मत दिली. महेंद्र करकाडे या रुग्णाला चेक देतांना त्यांचे कुटुंबीय सौ. माधुरी करकाडे, मुलगा टिंकू करकाडे, उपस्थित होते. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे सोबत तालुका कांग्रेसचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राकेश रत्नावर, दुर्गा मंदिर समितीचे सचिव संजय पडोळे, विश्वस्थ गुरु गुरनुले, उपस्थित होते. दुर्धर व गंभीर आजाराच्या उपचारासाठी CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून आर्थिक मदत केल्याबद्दल करकाडे कुटुंबीयांनी संतोषसिंह रावत व बँकेचे आभार मानले आहे.
