प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - दिनांक २१/१०/२०२१ रोजी मूल तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांचि पंचायत समिति मुलच्या सभागुहात सरपंच तालूका समितीची निवड करण्यासाठी बैठक बोलविण्यात आली. या बैठकीला तालुक्यातील बहुतेक सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. सर्वात प्रथम मुल तालुका सरपंच समितीच्या अध्यक्षपदी भेजगाव येथील संपूर्ण गावातून डायरेक्ट निवडून असलेले सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अखिल गांगरेड्डीवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यात सूचक विरई सरपंच प्रदीप वाढई यांनी सुचविले तर अनुमोदन बेंबाळं सरपंच करुणा उराडे यांनी दिले. उपाध्यक्ष पदासाठी कोसंबी येथील उच्चशिक्षित सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणारे श्री. रवींद्र कामडी यांचे नाव हरिभाऊ एनगनटीवार यांनी सुचविले असून अनुमोदन वासुदेव वाघ यांनी दिले. सचिव पदासाठी नांदगाव येथील धडाडीच्या उत्साही सरपंच एडव्हॉकेट कु. हिमानी दशरथ वाकुडकर यांचे नाव यशवंत खोब्रागडे यांनी सुचविले तर अनुमोदन अखिल गांगरेड्डीवार यांनी दिले. कोषाध्यक्ष पदासाठी जितेंद्र लोणारे यांचे नाव जालिंदर बांगरे यांनी सुचविले असून अनुमोदन दुर्वास कडस्कर यांनी दिले. सहसचिव म्हणून काजुताई खोब्रागडे यांचे नाव योगिता गेडाम यांनी सूचित केले अनुमोदन सुरज चलाख यांनी दिले. कार्यकारणी सदश म्हणून चिखली येथील सदस्य दुर्वास कडस्कर यांनी दिले. कार्यकारणी सदश म्हणून करुणा उराडे, योगिता गेडाम, यशवंत खोब्रागडे, राहुल मुरकुटे, दुर्वास कडस्कर, सुरज चलाख, प्रदीप वाढई, हरिभाऊ येनगणटीवार,वासुदेव पाल, पलिंद्र सातपुते, अतुल बुरांडे, जालिंदर बांगरे, यांची निवड करण्यात आली. सल्लागार समितीमध्ये राजगडचे उपसरपंच चंदू पाटील मारकवार, तांडाळा उपसरपंच राहुल मुरकुटे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून सुरज चलाख अशी समिती गठीत करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीचे उपस्थित सरपंच,उपसरपंच यांनी अभिनंदन केले.
