प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मागील चार वर्षांपासून मूल तालुक्यातील भादूरणी व कोसंबी गावात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत ग्राम विकासाची कामे केली जात असून प्रामुख्याने आरोग्य व शिक्षण यावर भर दिला जात आहे, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी २१/१०/२०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ.मिताली सैठी यांनी भादूरणी व कोसंबी ग्राम पंचायतीला प्रत्यक्ष भेटी दिल्या यावेळी मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाँ.मयूर कळसे व पदाधिकारी सोबत होते. भेटीत भादूरणी गावात वाचनालयाची पाहणी करुन सद्यस्थिती जाणून घेतली.सुसज्ज इमारत,मुलांसाठी आवश्यक पुस्तके,व इतर शैक्षणिक साहितत्या बाबत मुलांकडून विचारपूस केली. तसेच भादूरणी येथे VSTF च्या पुढाकारातून महिलांनी उभारलेल्या एल.ई.डी.Bulb व्यवसायाची पाहणी केली. गटातील अध्यक्ष ,सदश,यांचेशी चर्चा करुन व्यवसाय विषयी माहिती जसनुन घेऊन महिलांची प्रशंसा केली.व सरपंच ग्रामसेवक,कर्मचारी यांचेशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कल्पनेतून शिक्षण विषयावर अधिक भर घालावी यासाठी VSTF यात शिक्षण संस्था, म्याजिक बस,यांच्या समनव्यातुन शिक्षण दान मोहीम चंद्रपूर जिल्ह्यात राबविले जात असून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना भाषा व गणित विषयाचे ज्ञान मिळावे यासाठी गावातील स्वयंसेवकाची निवड करुन याचा शुभारंभ गांधी जयंती पासून करण्यात आला याचा देखील आढावा घेतला. यानंतर कोसंबी येथे भेट देऊन वाचनालयाची पाहणी केली व शिक्षणावर अधिक भर घालण्यासाठी भौतिक साधने उपलब्ध करुन घ्यावे याबाबत सरपंच,ग्रामसेवक, नागरिकांना काही सूचना केल्या. शिक्षण दानाबद्दल माहिती विद्यार्थ्यांना आहे काय याबाबत सी. ई.ओ.डाँ.मिताली सैठी यांनी विद्यार्थ्यांना गणितीय पाढे विचारले असता विद्यार्थ्यांनि पाढे वाचून दाखविले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या गावकऱ्यांशी व कर्मचाऱ्यार्शी चर्चा केली. कोविड-१९ च्या काळात शिक्षणात खंड पडला आणि विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क तुटला होता दीड वर्षात विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून विविध विषयाचे धडे दिले गेले नाही. करिता विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड गोडी निर्माण झाली पाहिजे यासाठी १००टक्के भर घालता यावा यासाठी उपस्थित शिक्षकांनी स्वयंसेवक, मॅजिक बस,VSTF चे तालुका समनव्यक याना सूचना केल्या. याप्रसंगी पंचायत समिती कृषी अधिकारी सुनील कारडवार, विस्तार अधिकारी, (पंचायत) जीवन प्रधान, विस्तार अधिकारी संजय पुप्पलवार, कोसंबीचे सरपंच रविंद्र कामडी, भादूरणी च्या सरपंच सौ.रेवता सोनूले,मारोडा सरपंच भिकारू शेंडे, सुरज आकंपल्लीवार,भादूरणीचे ग्रामसेवक जी.एस.श्रीरामे, जिल्हा समनव्यक विद्या पाल, शिक्षकवृंद, कर्मचारी,ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य, अनेक गावकरी,बचत गटातील महिला,मॅजिक बस SSO,अंगणवाडी सेविका,तालुका समनव्यक दीक्षा वनकर, इत्यादी उपस्थित होते.
