चंद्रपूर - बुधवार 13 ऑक्टोम्बरला सकाळी छत्रपतीनगर येथे चंद्रपूर मनपाच्या सफाई कर्मचारी महिलेला दुचाकी वाहनाने जोरदार धडक दिली, या धडकेत महिला गंभीर रित्या जखमी झाले.
छत्रपती नगर येथे सफाई कर्मचारी रस्त्यावर सफाई करीत होती त्यावेळी वेगात विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी वाहनाने त्या महिलेला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की यामध्ये महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
महिलेला धडक दिल्यानंतर जवळ उभे असलेले युवासेना शहर प्रमुख प्रमोद नन्नावरे व अविनाश घाटे यांनी त्या महिलेला चारचाकी वाहनाने तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचविले.
सदर अपघाताची माहिती युवा सेना पदाधिकाऱ्यांनी मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांना दिली, उपमहापौर पावडे यांनी महिलेला पालिकेतर्फे मदत देण्याचे आश्वासन दिले.
युवासेना पदाधिकाऱ्यांनी त्या दुचाकी वाहनाला पकडले असता महिलेच्या उपचाराचा संपूर्ण खर्च व आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
