चंद्रपूर - 16 ऑक्टोम्बरला पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनोळखी इसमाचे प्रेत आढळले होते, या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. Lcb chandrapur
घटनास्थळी कुठलाही पुरावा व शस्त्र आढळुन आले नसल्याने सदर तपास आव्हानात्मक असल्याने पोलीस अधीक्षक साळवे यांनी तपासाची धुरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचेकडे सोपविली. Murder case solve just 3 hours
मृतकाचे वय 40 ते 45 वर्ष वयोगटातील होते, सदर मृतकाचा फोटो शहरातील दुर्गापूर, रयतवारी, अष्टभुजा व प्रकाश नगर परिसरातील नागरिकांना दाखवीत ओळख परविण्याचा प्रयत्न केला असता मृतक हा प्रकाश नगर परिसरात राहणारा होता, त्याच नाव राजू अनंत मलिक असे निष्पन्न झाले.
त्या दिशेने स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केलं असता मृतकांच्या पत्नीचे व जितेंद्रसिंग भंडारी यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याची माहिती मिळाली.
तसेच मृतक व त्याच्या पत्नीशी भंडारी हा सतत संपर्कात होता.
या माहितीवरून पोलिसांनी जितेंद्र भंडारी याला दुर्गापुरातुन ताब्यात घेतले, व त्याची चौकशी सुरू केली.
आधी भंडारी हा उडवाउडवीची उत्तरे देत होता, मात्र कसून चौकशी केल्यावर त्याने मृतकांच्या पत्नी सोबत मागील 5 वर्षांपासून प्रेम संबंध असल्याची कबुली दिली.
मृतकाची पत्नी मागील वर्ष भरा पासून आपल्या माहेरी छत्तीसगड येथे गेली असून भंडारी यांच्या प्रेमात राजू अडसर झाला होता, त्याला ठार मारण्याचा कट जितेंद्र ने रचला व त्यानुसार विजयादशमी च्या रात्री 7 वाजता मृतक राजू ला जितेंद्र ने सिनर्जी वर्ल्ड परिसरातील निर्जन परिसरात नेत त्याला दारू पाजली, व राजू च्या डोक्यावर जितेंद्र ने वार करीत त्याला ठार केले.
पोलिसांनी जितेंद्र हत्येचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.
अवघ्या 3 तासात स्थानिक गुन्हे शाखेने हत्येच्या या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावला.
सदरील यशस्वी कामगिरी पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे, सचिन गदादे, अतुल कावळे, यांचे सह पो.हवा संजय आतकुलवार, स्वामी चालेकर, पंडीत वन्हऱ्हाडे, ना.पो.कॉ. गजानन नागरे, पो.शि. प्रशांत नागोसे, अमोल धंदरे, संदीप मुळे, रविंद्र पंधरे, नितीन रायपूरे, कुंदसिंग बावरी, प्रांजल झिलपे, गोपाल आतकुलवार, गणेश मोहूर्ले, दिपक डोंगरे, प्रशांत धुडगंडे, चानापोशि दिनेश अराडे यांनी केली.
