राजुरा - 9 सप्टेंबरला सास्ती जवळ वेकोली कर्मचाऱ्याचा अपघातात दुःखद मृत्यू झाला, 3 महिन्यानंतर हा कर्मचारी वेकोली मधून सेवानिवृत्त होणार होता.
सास्ती कडून जाताना सास्ती ओपेनकास्ट माईनच्या गेट व सर्वोदय विद्यालयासमोरील गेट समोरील कालीमाता मंदिरजवळ भरधाव वेगात येणारी अनियन्त्रित कार आदळल्याने कार चालक वेकोलि कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीप्रमाणे सास्ती ओपनकास्ट मध्ये चालक पदावर कार्यरत असलेलं सुरेश खडसे वय 59 हे आपल्या कार क्रमांक MH34 BV1245 ने सास्ती येथून जात असतांना सास्ती ओपनकास्ट आरसी जवळ असलेल्या कालीमाता मंदिराच्या तारेच्या कंपाऊंडला तोडून गणपतीच्या चबुतर्याला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की या रस्त्यावरील तीन दुचाकी गाड्या व शेडची मोडतोड झाली. जखमी कामगाराला तातडीने वेकोलि क्षेत्रीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सुरेश खडसे हे तीन महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली व आप्तपरिवार आहे. या दुर्दैवी घटनेने कामगार क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
