प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - रोटरी क्लब बल्लारपूरने दि.25 सप्टेंबर 2021 ला तालुक्यातील 9 शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना सन्मान प्रित्यर्थ देण्यात येतो. कोरोना काळात शिक्षण क्षेत्राचे नुकसान झाले. त्यात शिक्षकांची ऑनलाईन शिक्षण online education पद्धतीमुळे शिक्षकांची जणू तारेवरची कसरत. तरीसुद्धा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना योग्य ती मदत व शिक्षण प्रदान करण्यास चांगलेच झटले.
बल्लारपूर तालुक्यातील शिक्षकांमधून एकूण नव शिक्षकांचं रोटरी निवड प्रक्रियेचे पालन करत त्यांना हा “राष्ट्र घडवणारा सन्मान” प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सह प्रांतपाल रोटेरियन स्मिता ठाकरे ,माननीय वर्षा पिपरे मॅडम गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बल्लारपूर ,सह प्रांतपाल प्रशांत भोरे ,रोटरी क्लब बल्लारपूरचे अध्यक्ष मनीष मुलचंदानी, सचिव उमेश पटेल, प्रोजेक्ट सेक्रेटरी रवि साळवे यांची उपस्थिती होती.
मंचावरील अतिथी द्वारे कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली .प्रोजेक्ट सेक्रेटरी रवि साळवे यांनी प्रास्ताविकेतून नेशन बिल्डर अवार्ड मिळालेल्या शिक्षकांची निवड कशी करण्यात आली याबाबत सविस्तर सांगितले .
तदनंतर रोटरी क्लब बल्लारपूरच्या समितीने निवडलेल्या 9 शिक्षकांना शाल,श्रीफळ,प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन नेशन बिल्डर Nation Builder अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकांत शिवकुमार विरन्नाजी पडीशालवार, कर्मवीर ज्यू .कॉलेज येनबोडी, माधुरी सुधीर कोरडे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इटोली ,वंदना सुरेश कुळसंगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसगाव, अमित गजानन साखरकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमना, प्रीती विलास जगझाप जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बामणी दूधोली, पंकज वामन मत्ते जनता सिटी ब्रांच विद्यालय बल्लारपूर, अरुण मुरलीधर टोंगे चिंतामणी विद्यालय विसापूर ,उषा केशवराव बल्लावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुनाभट्टी, तारा विजय सोनटक्के साईबाबा नगर परिषद प्राथमिक शाळा बल्लारपूर यांचा यात समावेश आहे . सत्कारमूर्ती प्रीती विलास जगताप यांनी आपल्या मनोगतातून रोटरी क्लब बल्लारपूर च्या कार्याची प्रशंसा केली.
रोटरी क्लब बल्लारपूर सोबत कार्य करण्याची संधी मिळाली तर ती संधी आम्ही घेणार असं त्यांनी व्यक्त केलं .
या सन्मान सोहळ्यात रोटरी क्लब बल्लारपूरचे Rotary Club Ballarpur सदस्य प्रशांत दोंतुलवार ,राजु मुंधडा,कल्पेश पटेल, प्रफुल चरपे, शैलेश झाडे,हर्षद गंधेवार, विक्रांत पंडित ,राहुल वरू, राम तंपालू,महेश कायरकर,उत्तम पटेल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शहरातील श्री मार्कंडेय शिव मंदिर सभागृहात हा सन्मान सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याचं सूत्रसंचालन रोटेरियन निलेश
चिमड्यालवार यांनी तर आभारप्रदर्शन सचिव उमेश पटेल यांनी केलं.
