चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजप गटनेते वसंता देशमुख यांना गटनेतेपदावरून हटविण्याच्या हालचालींना वेग आला आहे, देशमुख यांना चार महिन्यांपूर्वी स्थायी समिती अध्यक्षपद मिळाले नसल्याने ते सध्या पक्षावर नाराज झाले आहेत, पक्षाच्या सर्व आदेशांना धुडकावून लावत बैठक व आमसभेत भाजप विरोधी घेतली आहे असून सध्या भाजप आणि मित्रपक्षांच्या "भाजप मित्रपक्ष आघाडी" चे 34 नगरसेवक नागपूर कडे रवाना झाले. विभागीय आयुक्तांना भेटून हे नगरसेवक वसंता देशमुख यांना हटवून भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका जयश्री जुमडे यांना गटनेतेपदी नियुक्त करण्याबाबत पत्र देण्यात येणार आहे.
Chandrapur municipal corporation
चार महिन्याने आधी वसंत देशमुख यांना स्थायी समिती अध्यक्षपद नाकारल्या पासून ते नाराज आहेत पक्षाच्या बैठका व मनपाच्या आमसभेत त्यांनी भाजपला प्रतिकूल भूमिका घेतली आहे. दुपारी 3 वाजता विभागीय आयुक्तांसमोर ओळख परेड झाल्यावर जयश्री जुमडे यांची गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी वसंता देशमुख स्वतः इच्छुक आहे तर दुसरीकडे भाजप कडून जी नावं स्थायी समिती मध्ये सदस्य म्हणून पाठवायची आहे त्याला देशमुख यांचा विरोध आहे. स्थायी समिती सदस्यांची नावं पाठवतांना देशमुख यांनी दगाफटका करू नये म्हणून वसंता देशमुख यांची गटनेतेपदावरून उचलबांगडी करण्याची भाजप श्रेष्ठींचा प्रयत्न आहे. वसंता देशमुख आणि सतीश घोनमोडे हे 2 नगरसेवक वगळता भाजपचे 35 पैकी 33 नगरसेवक नागपूरला रवाना झाले आहेत.
विशेष म्हणजे वसंता देशमुख हे भाजप पक्षाशी एकनिष्ठ असून त्यांनी आपल्या प्रभागात भाजपला उभारी देत विकासाचे महत्वपूर्ण कामगिरी केली, मात्र पद देताना देशमुख यांना नेहमी डावलण्यात आले.
