चंद्रपुर :- राज्य व केंद्र शासनात नविन पदभरती बंद झालेल्या आहेत, खाजगी क्षेत्रात पण पाहिजे त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. अश्यातच मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमळून गेली आहे.
यामुळे बेरोजगार त्रस्त झाले आहेत व्यवसाय करायची इच्छा असून पुरेसे आर्थिक पाठबल नसल्याने व्यवसाय करनेही शक्य नाही अशी सुशिक्षित बेरोजगारांची स्थिती झालेली आहे.
असेच काही बेरोजगार समाजसेवक भूषण फुसे यांना भेटले, आम्हाला रोजगाराची संधी शासकीय व खाजगी ठिकाणी मिळत नसल्याने उद्योग किव्हा व्यवसाय करण्यास सहकार्य करावे अशी आपली व्यथा मांडली, सदैव समाजसेवेचा वसा घेऊन कार्य करणारे, दिव्यांग, तृतीय पंथीय व निराधारांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य करणारे समाजसेवक भूषण फुसे यांनी आपणास काय मदत लागेल या अनुषंगाने तुकुम परिसरात राहणारे आसिफ अली सैय्यद या बेरोजगार युवकास स्वखर्चाने मुंबई ला नेऊन कपडे खरेदी करून चंद्रपुर शहरातील तुकुम परिसरात व्यवसाय सुरु करण्यास सहकार्य केले.
अश्या प्रकारचे सहकार्य प्रत्येक जनप्रतिनिधिंनी व समाजसेवकांनी सुशिक्षित बेरोजगारांना करावे, यामुळे मला रोजगार प्राप्त झाला मी नेहमीच त्यांचा आभारी राहील.
बेरोजगार युवकांनी आत्मनिर्भर व्हावे या भावनेतुन हे कार्य केले व यपुढेही अशी मदत करत राहणार अशी भावना समाजसेवक भूषण फुसे यांनी व्यक्त केली.
यावेळी राजूभाऊ सूर्यवंशी, महेंद्र ठाकुर, पंकज गुडघाने, रघु बंडीवार, लोहित गोगोई आदिंची उपस्थिति होती.
