भद्रावती - दिनांक २५/०८/२०२१ रोजी पिपरी तालुका भद्रावती येथे लसीकरण आयोजित करण्यात आले,मात्र लस उपलब्ध नसल्यामुळे तोंडी चौखुऱ्याची मोठ्या प्रमाणात जनावरांवर साथ असताना मात्र लस नसल्यामुळे घटसर्प चे लसीकरण करण्यात आले.तसेच तोंडी चौखुऱ्याची लागण झालेल्या जनावरांवर उपचार करण्यात उपचार करण्यात आले आणि आधार कार्ड लावण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ आलम साहेब, जेनेकर साहेब,सहाय्यक बाळुभाऊ आणि सहाय्यक अजय निमकर उपस्थित होते. News34 तोंडी चौखुऱ्याची लागण मोठ्या प्रमाणत असल्यामुळे शेती हंगामावर आणि दूध उत्पादनात मोठा परिणाम झाला आहे.तसेच शेती हंगाम सुरू असताना जनावरांवर साथीच्या रोगाची लागण होत असल्यामुळे शेतकरी आणि दूध उत्पादकावर आर्थिक ताण येत आहे.तब्बल १ वर्षानंतर गावात लसीकरण झाल्यामुळे शेतकरी आनंदी दिसले मात्र तोंडी चौखुऱ्याची लस उपलब्ध नसल्याचे कळताच नाराजी व्यक्त केली.त्यामुळे लवकरात लवकर लस उपलब्ध करून भद्रावती तालुक्यात लसीकरण मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदिप अण्णाजी कुटेमाटे , संस्थापक अनुप सुधाकर कुटेमाटे, ग्रा प सदस्या सुनीता दर्वे, ग्रा प सदस्या कविता कुटेमाटे,सतीश कुटेमाटे,सचिन नांदे, मोहन दर्वे,योगेश मत्ते,अक्षय कुटेमाटे,योगेश कुटेमाटे, रजत आसुटकर,सुमित मडकाम आणि गावकऱ्यांनी केली आहे.
