कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या दबावाखाली केलेली अटक संवैधानिक नसून हे केवळ सूडबुद्धीचे राजकारण आहे.सत्तेचा गैरवापर करण्यात आलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ २५ ऑगस्ट रोजी गडचांदूर येथील संविधान चौक येथे शहर भाजपा,यूवामोर्चा,महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.सदर आंदोलनात गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार, नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे,भाजप नेते निलेश ताजने,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर, न.प.च्या माजी नगराध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी डोहे, सपना सेलोकर,रोहन काकडे, संदीप शेरकी,इम्रान पाशा,राकेश अरोरा,प्रतीक सदनपवार, अजी़म बेग, गजानन शींगरु,बंटी गुरनुले, तुषार देवकर, योगेंद्र केवट, विवेक भेदोळकर, सुयोग कोंगरे,वैभव पोटे, सत्यदेव शर्मा, अभीषेक जोगी,देवीदास पेंदोर, विनोद चौधरी,सौ. पायल येलमुले,बळीराम ताळे, रवींद्र उरकुडे,दिलीप पांडे इतर भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
