कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात सप्ताह कार्यक्रम राबवून प्रहार सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे.याच पार्श्वभूमीवर १० आगस्ट रोजी गडचांदूर येथे प्रहारतर्फे दिव्यांग,ज्येष्ठ नागरिक व बालकांची मोफत आरोग्य तपासणी तसेच औषधांचे वाटप करण्यात आले. डॉ.कुलभूषण मोरे व डॉ.आरती पानघाटे यांनी तपासणी करून रुग्णांना औषधी दिली. News34
कोरपना,जिवती तालुक्यात विविध कार्यक्रम राबवून सदस्य नोंदणी मोहिम राबविण्यात येणार असून गडचांदूर येथील बंगाली कॅम्प येथे ६६ जणांची आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप करून सभासद नोंदणीला सुर्वात करण्यात आली आहे.या प्रसंगी प्रहारचे सतीश बिडकर, अरविंद वाघमारे,पंकज माणूसमारे,अनूप राखुंडे,नितेश कोडपे,आमने,सुरज बार, मिथुन घुले,महादेव बिस्वास,हलदार, सत्वशिला घुले,कमला घुले,शोभाबाई यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

