चंद्रपूर:- रक्षण धरणी मातेचे फाउंडेशनच्या महिला ब्रिगेड तर्फे १५ व १६ ऑगस्ट दोन दिवसीय मोफत "टाकाऊ पासून टिकाऊ" कार्यशाळा घेण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले. आणि सर्व भारतीयांनी अमृत महोत्सव साजरा केला. मात्र मानव निर्मित प्लास्टिक प्रदूषणाचे थैमान जगभर पसरले आहेत. प्लास्टिक पासून होणाऱ्या वेगवेगळ्या प्रदूषणा पासून स्वतःला स्वतंत्र करण्याची वेळ आज आली आहे. या अमृत महोत्सवाचे औचित्याने प्रत्येक भारतीय नागरिकांनी स्वतःचे कर्तव्य म्हणून प्लास्टिकचा वापर कमीत कमी करून त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्त होऊ शकतो. संस्थेचे अध्यक्ष राहुल कोटकर यांचे उद्देश्य प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी टाकाऊ प्लास्टिक पासून विविध प्रकारचे शोभेच्या वस्तू बनवून ते उपयोगाकरिता आणणे. त्याचप्रमाणे हॅन्ड मेड राखी याचे सुद्धा प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेला महिलांचा व विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेचे प्रशिक्षण प्रीती पोटदुखे यांनी दिले. व या कार्यशाळेचे आयोजन नीत डान्स & फिटनेस स्टुडिओ येथे करण्यात आले.
