चंद्रपूर - दि.१० आॕगस्ट २०२१ सुधारित विद्युत कायद्या-२०२१ ला विरोध करण्यासाठी देशव्यापी सात सघंटनाची नॕशनल को-आॕडिनेशन कमेटी आॕफ एम्पलाॕईज अॕड इंजिनियर्स च्या नेतृत्वाखाली संप आयोजित केलेला आहे.दि.३ आॕगस्ट ते ६ आॕगस्ट २०२१ पर्यत संसद भवन,जतंरमतंर दिल्ली येथे प्रदर्शन आयोजित केले होते. NCCOEEE च्या नेतृत्वाखाली दिल्लीत झालेले आदोंलन व विघुत कायद्या-२०२१ बाबत वास्तविक परिस्थिती तसेच दि.१० आॕगस्ट संपाबाबत तयारी करीता दि.०९.०८.२०२१ रात्री ३.०० ते ५.०० वाजेपर्यत NCCOEEE ते प्रमुख काॕ.चक्रधर सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत गुगुल मिट अॕपवर आॕनलाईन बैठक झाली.या बैठकीस महाराष्ट्रातील काॕ.मोहन शर्मा,मा.सजंय ठाकुर,मा.कृष्णा भोयर व मा.सुनिल जगताप उपस्थित होते.#news34
बैठकीचे प्रास्तविक काॕ.कृष्णा भोयर यांनी केले व काॕ.मोहन शर्माजी तसेच मा.सजंय ठाकुर यांनी *नॕशनल को-आॕडिनेशन कमेटी आॕफ एम्पलाॕईज अॕड इंजिनियर्स* च्या निर्णया बाबत माहिती दिली.केंद्र सरकार विघुत कायद्या-२०२१ संसदेच्या चालु अधिवेशनात आणणार नाही म्हणून संप तृर्त पूढे ढकल्याचा निर्णय नॕशनल को-आॕडिनेशन कमेटीने घेतलेला आहे.दि.१३ आॕगस्ट पर्यत लोकसभा अधिवेशन आहे जर या अधिवेशनात बिल आणण्याचा प्रयत्न झाला तर लाईटनिंग संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
NCCOEEE ने घेतलेल्या निर्णया नुसार महाराष्ट्रातील संप करी सघंटना पदाधिकारी यांची आॕनलाईन बैठक झाली व त्यात संप तृर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
NCCOEEE ने घेतलेल्या निर्णया नुसार महाराष्ट्रातील संप करी सघंटना पदाधिकारी यांची आॕनलाईन बैठक झाली व त्यात संप तृर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.